T20 WC 2024 : लाजिरवाण्या कामगिरीनंतर केन विलियम्सननं कर्णधारपद सोडलं; सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारलं

T20 WC 2024 : लाजिरवाण्या कामगिरीनंतर केन विलियम्सननं कर्णधारपद सोडलं; सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारलं

टी20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडची कामगिरी सुमार राहिली आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. या लाजिरवाण्या कामगिरीची जबाबदारी केन विलियम्सन याने घेतली असून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

केन विलियम्सन याने मोठा निर्णय घेत वन डे आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारले आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. अर्थात यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, केन विलियम्सन याने आपल्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. न्यूझीलंडसाठी मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळलो याचा मला आनंद असून भविष्यातही मी योगदान देत राहीन. पण सध्या मी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पण क्रिकेटबाहेरील माझे जीवन खुप बदलले आहे. मलामाझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे, असे केन विलियम्सन म्हणाला. याचाच अर्थ त्याने कर्णधारपद सोडले असले तरी आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

बोल्टचा अखेरचा वर्ल्डकप

केन विलियम्सन याने कर्णधारपद सोडण्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने मोठा निर्णय घेतला होता. हा आपला अखेरचा टी20 वर्ल्डकप असल्याचे बोल्टने जाहीर केले होते. आता टी20 प्रकाराचा पुढील वर्ल्डकप 2026 मध्ये होणार आहे. त्यात बोल्ट आणि विलियम्सन खेळण्याची शक्यता माळवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;