Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बार्शीच्या तरुणानं संपविलं जीवन, चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगेसायरेची अंमलबजावणी करावा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असतानाच आता हा मुद्दा आणखी तापला आहे. एकीकडे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना दुसरीकडे मराठी समाजाच्या तरुणांचे आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव आहे. आता बार्शी येथील तरुणाने चिठ्ठी लिहून जीवन संपवले आहे.
पुण्यामध्ये एका खासगी कंपनीत काम करणारा बार्शीतील तरुण शंभुभक्त प्रसाद देठे यांने मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. देठे याच्या आत्महत्येमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.
फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख प्रसाद देठे याने केला आहे. देठे याच्यामागे पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
जयोस्तु मराठा,
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.
तुमचाच प्रसाद
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List