नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसवा! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसवा! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

गेल्या दोन वर्षांपासून नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असून त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱया रुग्णांना जादा पैसे खर्च करून खासगी लॅबमध्ये जाऊन एमआरआय चाचणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सोयीसाठी नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना  पक्षातर्फे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

नायर रुग्णालयात भरती असलेले सर्वसाधारण दहा ते बारा रुग्ण तसेच नवीन येणाऱयांपैकी दहा ते बारा रुग्णांची एमआरआय तपासणी सुचविली जाते. नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद असून ते दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत. यामुळे नाइलाजाने येथे येणाऱया रुग्णांना इतर पॅथोलॉजी लॅबमध्ये जाऊन जादा पैसे देऊन एमआरआय चाचणी करून घ्यावी लागते किंवा शीव रुग्णालयात जावे जागते. यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. यासंदर्भात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून अत्यावश्यक बाब म्हणून 2024 च्या अर्थसंकल्पात केलेल्या निधीच्या तरतुदींचा वापर करून नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसविण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर, रंजना नेवाळकर, चिटणीस संजय वाघ, अरविंद नागनुरी, प्रकाश शिंदे, महेश गुरव आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;