मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ

मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकमधून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर येथून मिंधे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचे वृत्त धडकले. मात्र अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठल्या. यावर आता स्वत: छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले. नाराजीच्या चर्चा सर्व अफवा असून मी अजितदादांसोबत नाही, राष्ट्रवादीसोबत आहे, असे गोलमटोल उत्तर छगन भुजबळ यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, विधानसभेआधी किंवा त्यानंतरतही मी कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीसोबत कायम राहणार आहे. तसेच मी नाराज असून दुसऱ्यांना नेत्यांची भेट घेतली. यात कोणतेही तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचे असेल तर मी उघडपणे भेटेन, असेही ते म्हणाले.

…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली

नाराजीच्या चर्चा साफ खोट्या असून राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होत असतो, पण लागलीच दुसऱ्या दिवशी कामालाही लागतो, असेही भुजबळम म्हणाले.

कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीही नाराज असतील, शरद पवारही नाराज असती, देवेंद्र फडणवीसही नाराज असतील, बारामतीची जागा का गेली? हा विचार करत अजित पवारही नाराज असतील. पण नाराजीनंतरही ज्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले, तसे मी देखील कामाला लागलो आहे. मी नाराजही नाही आणि कुणाला भेटलोही नाही, असेही भुजबळ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;