चेन्नई-मुंबई इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रवासी सुरक्षित
चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा संदेश मिळाला. या माहितीनंतर रात्री 10.30 वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं.
एका निवेदनात, एअरलाइनने बॉम्बच्या धमकीची पुष्टी केली आणि सांगितलं की प्रोटोकॉलचे पालन केलं गेलं आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं.
‘चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5149 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. मुंबईत उतरल्यावर, क्रूनं प्रोटोकॉलचं पालन केले आणि विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आलं’, असं एअरलाइननं सांगितलं.
‘सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांसोबत काम करत आहोत आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत आणलं जाईल’, असं त्यात म्हटलं आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयाला बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितलं की, अज्ञात व्यक्तीनं मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी दिली.
धमकीच्या ईमेलनंतर, पोलिसांनी इमारतीचा शोध घेतला आणि सांगितलं की त्यांना ‘काहीही संशयास्पद’ आढळलं नाही.
या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List