माजी राज्यपाल मुरलीधर भांडारे यांचे निधन

माजी राज्यपाल मुरलीधर भांडारे यांचे निधन

ओरिसाचे माजी राज्यपाल मुरलीधर भांडारे यांचे दिल्ली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 95 वर्ष होते.  त्यांनी तीन वेळा राज्यसभेची खासदारकी भुषवली होती. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाट येथील वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर भांडारे हे मुळचे गिरगाव येथील रहिवासी होते. सर्वेच्च न्यायालयाचे निष्णात विधिज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. दिल्लीतील मराठी मंडळी, कला संगीत क्षेत्रात तसेच बार असोसिएशनमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी लक्षणीय काम केले होते. युनोच्या ह्युमन राईट कमिटीचे अध्यक्ष या नात्याने भांडारे यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या पश्चात  मुलगा, सून, कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;