पॅरीस ऑलिम्पिकआधी निरज चोप्रा फॉर्मात, पावो नुरमी गेम्समध्ये सुवर्णपदकावर निशाणा

पॅरीस ऑलिम्पिकआधी निरज चोप्रा फॉर्मात, पावो नुरमी गेम्समध्ये सुवर्णपदकावर निशाणा

हिंदुस्थानचा ‘गोल्डन बॉय’ निरज चोप्रा ऑलिम्पिकआधी फॉर्मात आला आहे. पावो नुरमे गेम्समध्ये निरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 85.97 मीटर भाला फेकला.

मंगळवारी फिनलँडच्या तुर्कूमध्ये खेळ्या गेलेल्या स्पर्धेत हिंदुस्थानकडून निरज चोप्राने भाग घेतला होता. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. पॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी निरज चोप्रा फॉर्मात आल्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

पावो नुरमे गेम्समध्ये निरज पहिल्या स्थानावर राहिला, तर फिनलँडचा टोनी केरेनन याने 84.19 मीटर दूर भाला फेकत रौप्यपदक जिंकले. फिनलँडचाच ओलिव्हर हेलँडर हा तिसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 83.96 मीटर दूर भाला फेकत कांस्यपदक जिंकले.

दरम्यान, या स्पर्धेत निरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले असले तरी त्याची कामगिरी तशी साधारणच राहिली. त्याला एकदाही 90 मीटरच्या आसपास भाला फेकता आला नाही. त्याने पहिल्या प्रयत्नात 83.62 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 83.45 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर, चौथ्या प्रयत्नात 82.21 मीटर, पाचवा प्रयत्ना फाऊल राहिला आणि सहाव्या प्रयत्नात 82.97 मीटर भाला फेकला.

neeraj

निरज चोप्रा याने 2022 मध्ये 89.30 मीटर भाला फेकत रौप्यपदक जिंकले होते. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वर्षी झालेल्या डायमंड लीगमध्ये निरजने 89.94 मीटर भाला फेकला होता. मात्र त्यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये त्याला एकदाही आपल्या सर्वोत्तम कामगिरीजवळही पोहोचता आलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;