23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण; उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण; उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. काही बारीकसारीक गोष्टी बाकी आहेत. जुलै महिनाअखेरपर्यंत त्या पूर्ण होतील. त्या झाल्यावर खरे काम सुरू होईल.  शिवसेनाप्रमुखांच्या जीवन प्रवासाबाबत अनेक बाबी करायच्या आहेत, त्याला सुरुवात केली जाईल. ऑगस्टपासून स्मारकाच्या आतील डिस्प्लेचे काम सुरू होणार असून 23 जानेवारी 2025 पर्यंत स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्मारक दादरमधील शिवाजी पार्क येथे उभे राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम आणि कामाचे विविध टप्पे तज्ञ वास्तूविशारदांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, भुपाल रामनाथकर उपस्थित होते.

बाळासाहेबांचे फोटो, भाषणे, आठवणी, लेख आणून द्या! 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आवाहन केले.

स्मारकामध्ये शिवसेनाप्रमुखांचे फोटो, भाषणे, आठवणी, लेख मांडले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे फोटो, भाषणे, बातम्या, आठवणी, लेख असतील त्यांनी ते शिवसेना भवन किंवा स्मारकाच्या ठिकाणी आणून द्यावेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान, ज्या ज्या व्यक्ती बाळासाहेबांच्या सान्निध्यात होत्या त्यांच्या उल्लेख बाळासाहेबांच्या स्मारकात करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

स्मारकाच्या कामाबद्दल समाधानी

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम अखंडपणे सुरू आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनासाठी स्मारकाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्मारकाच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;