विधान परिषदेसाठी 12 जुलैला मतदान

विधान परिषदेसाठी 12 जुलैला मतदान

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभवामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मिंधे गट व अजित पवार गटातील अस्वस्थ आमदार बाहेर पडण्याची चर्चा आहे. या निवडणुकीतील गुप्त मतदानामुळे महायुतीच्या नेत्यांना क्रॉस व्होटिंगची चिंता आता सतावत आहे.

विधान परिषदेतील भाजपचे  चार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, शिंदे गटाचा एक, काँग्रेसचे दोन तर अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक अशा एकूण 11 आमदारांची मुदत येत्या 27 जुलै 2024 रोजी संपत आहेत. विधानसभेच्या ऐन पावसाळी अधिवेशनात विधान परिषद निवडणूक होत असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजप आणि छोटय़ा मित्र पक्षाचे मिळून पाच, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले तर विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे.

मुदत संपणारे आमदार

 विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), डॉ. मनीषा कायंदे (शिंदे गट), अॅड. अनिल परब (शिवसेना), बाबाजानी दुर्राणी (अजित पवार गट), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष), जयंत पाटील (शेकाप)

विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित

आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेची कारवाई यामुळे विद्यमान विधानसभेतील संख्याबळ 288वरून 274वर आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;