‘एनडीए’तील लोक आमच्या संपर्कात; एक छोटीशी गडबड झाली तरी मोदी सरकार कोसळणार

‘एनडीए’तील लोक आमच्या संपर्कात; एक छोटीशी गडबड झाली तरी मोदी सरकार कोसळणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंदुस्थानातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. एनडीएमधील मित्र पक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे आहे. सरकारला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे एक छोटीशी जरी गडबड झाली तरी मोदी सरकार कोसळेल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मोदी सरकारमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कातत आहेत, असा गौप्यस्फोटही राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर राहुल गांधींनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. निवडणूक निकालामुळे मोदींची विचारधारा संपली आहे. भाजपचा मूळ पाया आणि धार्मिक द्वेष पसरवण्याची त्यांची विचारधाराही डळमळीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

मोदींच्या गटात प्रचंड असंतोष

भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. मित्र पक्षांच्या टेकूवर मोदींचे सरकार आहे. एका जरी मित्र पक्षाने भूमिका बदलली तर हे सरकार पडेल. एक छोटीशी गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते. मोदींच्या गटातही मोठा असंतोष आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपका&त आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला.

‘इंडिया’ आघाडीला जनतेने साथ दिली

द्वेष पसरवणे, भावना भडकावून आपला राजकीय हेतू साध्य करायचा, अशी भाजपची विचारधारा आहे. मात्र देशातील जनतेने भाजपची ही विचारधारा फेटाळली, असे राहुल गांधींनी ठणकावले. इंडिया आघाडीने एकजुटीने निवडणूक लढली आणि जनतेने आम्हाला साथ दिली, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;