चित्रपटांमध्ये अपयश मात्र सोशल मीडियावर स्टार बनली सलमानची ऑनस्क्रीन बहीण; कमावते इतके कोटी रुपये
सोशल मीडियावर स्टार बनणं हे प्रत्येकालाच जमत नाही. इथे चाहत्यांसाठी काही सेकंदांची रिल किंवा व्हिडीओ बनवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना कित्येक तास मेहनत करावी लागते. ठराविक लोकांनाच त्यामध्ये यश मिळतं. कलाविश्वात असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय श्रेत्रात नशीब आजमावल्यानंतर सोशल मीडियाकडे मोर्चा वळविला आणि तिथून प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
यामध्ये टीव्ही अभिनेत्री आशिका भाटियाचाही समावेश आहे. 'परवरिश- कुछ खट्टी कुछ मिठी' या मालिकेत गुणवंत कौर आहलुवालियाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. यानंतर तिला थेट अभिनेता सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाची ऑफर मिळाली.
सलमानच्या या चित्रपटात आशिकाने त्याच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटानंतर तिला फारशा ऑफर्स मिळाल्या नाहीत. अखेर घरी बसल्या बसल्या आशिकाने स्वत:चा युट्यूब चॅनल सुरू केला आणि त्यावर व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List