घटस्फोटानंतरही पतीसोबत मैत्री कायम ठेवण्याबद्दल व्यक्त झाली प्रसिद्ध अभिनेत्री
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुती उल्फत ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रुती तिच्या मालिकांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. श्रुतीने 1997 मध्ये आलोक उल्फतशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.
श्रुती आणि आलोक यांना एक मुलगा असून घटस्फोटानंतर तो आईसोबतच राहतो. घटस्फोटानंतर पतीसोबत नातं कसं आहे, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतरही पतीसोबत मैत्री कायम असल्याचं तिने सांगितलं आहे.
पूर्व पतीविषयी श्रुती म्हणाली, "आलोकसोबत माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर होता. पती-पत्नी म्हणून आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवला. मात्र अनेकदा अशा गोष्टी घडतात, ज्या घडायला नाही पाहिजे. अशा वेळी वेगळं राहणं हाच पर्याय उत्तम असतो."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List