अगदी थोडक्यात वाचला अमिताभ बच्चन यांचा जीव, बिग बी यांनी अखेर ‘तो’…

अगदी थोडक्यात वाचला अमिताभ बच्चन यांचा जीव, बिग बी यांनी अखेर ‘तो’…

अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियासोबतच चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अनेक चाहते अमिताभ बच्चन यांच्यासाठीच ‘काैन बनेंगा करोडपती’ हा शो पाहतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा गुडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट धमाका करताना देखील दिसला.

आता नुकताच अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. अमिताभ बच्चन यांनी एक अशी गोष्ट सांगितली की, लोक चांगलेच हैराण झाले आहेत. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत. ‘शोले’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एकसोबत काम केले आहे. विशेष म्हणजे हा सर्वात हिट ठरलेला चित्रपट आहे.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. आता शोले चित्रपटाच्या शूटिंगवेळी आपल्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. अमिताभ बच्चन म्हणाले की, शोले चित्रपटाच्या शेवटच्या शूटिंगसाठी रमेश सिप्पी यांनी खऱ्या गोळ्यांचा बंदोबस्त केला होता.

एका सीनवेळी धर्मेंद्र यांना अमिताभ बच्चन यांच्यावर बनावट गोळ्या झाडायच्या होत्या. तो सीन व्यवस्थित येत नसल्याने दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांना ते दोन ते तीन वेळा शूट करण्यास सांगितले. मात्र, याचा प्रचंड राग धर्मेंद्र यांना आला. मग काय ज्यावेळी पुढच्यावेळी दिग्दर्शकाने परत एकदा तो सीन शूट करण्यास सांगितले, त्यावेळी धर्मेंद्र यांनी चक्क खऱ्या गोळ्या अमिताभ बच्चन यांच्यावर झाडल्या.

अमिताभ बच्चन यांचे नशीब इतके चांगले की, धर्मेंद्र यांचा निशाणा चुकला आणि थोडक्यात बिग बी वाचले. अमिताभ बच्चन यांच्या अगदी कानाजवळून गोळी गेली. स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबद्दलचा खुलासा काैन बनेंगा करोडपतीमध्ये केला आहे. आता अमिताभ बच्चन यांनी सांगितलेल्या हा किस्सा जोरदार चर्चेत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. धर्मेंद्र हे देखील सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;