मुलं मित्रांसोबत रूममध्ये म्हणून…, शाहरुख खान याच्याकडून मोठा खुलासा

मुलं मित्रांसोबत रूममध्ये म्हणून…, शाहरुख खान याच्याकडून मोठा खुलासा

अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या तीन मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसतो. आर्यन खान आणि सुहाना खान यांच्यानंतर किंग खान – गौरी खान यांनी अबराम याचं जगात स्वागत केलं. अबराम हा खान कुटुंबातील सर्वात लहान आणि लाडका मुलगा आहे. 27 मे 2013 मध्ये अबराम याचा जन्म झाला. अबराम याच्या जन्मानंतर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दोन मुलं असताना आणि या वयात तिसऱ्या मुलाची काय गरज होती? असे प्रश्न किंग खान याला विचारण्यात येत होते.

अबराम याच्या जन्मानंतर विचरण्यात येत असलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील अभिनेत्याने 2013 मध्ये झालेल्या मुलाखतीत दिलं होतं. शाहरुख खान म्हणाला होता, ‘माझा मुलगा 16 वर्षांचा आणि मुलगी 13 वर्षांची.. पण गेल्या 4 – 5 वर्षांपासून ते घरात कमी आणि बाहेर जास्त राहायला लागले आहेत. शाळेत जायला लागले आहेत…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

‘आधी कायम माझी दोन्ही मुलं माझ्या आजू-बाजूला असायची. सतत मला चिटकून असायची… मला देखील त्यांच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करता येत होता. पण गेल्या 4 – 5 वर्षांपासून मुलं त्यांचं आयुष्य जगायला लागली आहेत. मित्रांसोबत त्यांच्या खोलीत राहायला लागली आहेत.’

‘कधी – कधी हे देखील माहिती नसतं की आर्यन – सुहाना घरी आहेत की नाही. त्यानंतर आर्यन शिक्षणासाठी लंडनमध्ये गेला. सुहाना देखील परदेशात गेली. आम्ही कधीच मुलांवर कोणता दबाव टाकला नाही. मुलं त्यांना जे हवं ते करू शकतात. पण आम्हाला सतत त्यांची आठवण यायला लागली होती.’

‘जेव्हा अबराम याचा जन्म झाला तेव्हा गौरी हिने चाळीशी ओलांडली होती. या वयात प्रेग्नेंसी धोक्याची ठरू शकते. याच कारणामुळे आम्ही सरोगेसीच्या मदतीने अबरामचं या जगात स्वागत केलं….’ असं म्हणते अभिनेत्याच्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली होती.

सांगायचं झालं तर, अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय अबराम याला कायम कुटुंबातील सदस्यांसोबत स्पॉट केलं जातं. खुद्द शाहरुख – गौरी देखील अबराम याच्यासोबत फोटो पोस्ट करत असतात. अबराम सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;