विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान; निवडणूक आयोगाकडून घोषणा

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान; निवडणूक आयोगाकडून घोषणा

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. या घोषणेसोबतच त्यांनी वेळापत्रकही जारी केलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार असून 12 जुलै रोजीच त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी करण्यात येईल. उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत दाखल करता येईल. तर 3 जुलै रोजी अर्जांची छाननी केली करण्यात येईल. उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. यानंतर 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल. सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत मतदानाची वेळ असेल. त्यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया सुरू करून निकाल जाहीर केला जाईल.

विधानसभा आमदारांच्या मतदानातून विधान परिषदेवर पाठवण्यात आलेल्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपत आहे. या आमदारांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये निलय नाईक, विजय गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनीषा कायंदे (शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांच्या नावांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;