‘मला काही ऐकू येत नाही…’, ज्येष्ठ गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजाराने त्रस्त

‘मला काही ऐकू येत नाही…’, ज्येष्ठ गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजाराने त्रस्त

बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांच्याशी संबंधित धक्कादायक बातमी येत आहे. वास्तविक अलका याग्निक या दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डरच्या शिकार झाल्या आहेत. या आजारामुळे गायिका अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही. या बातमीने बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. आपल्या आजारासंदर्भात अलका याग्निक यांनीच सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Yagnik (@therealalkayagnik)

अलका याग्निक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आजारपणाबाबात माहिती दिली आहे. मी काही दिवसांपूर्वी एका विमान प्रवासात होते. दरम्यान, विमान प्रवासातून बाहेर आले आणि काही ऐकू येईनासे झाले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असे निदान डॉक्टरांनी केले आहे. कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणे टाळा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच तुम्हा सर्वांचे प्रेम असेच माझ्यावर राहू द्या. या कठीण काळात तुमचा पाठिंबा, प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे अलका याग्निक म्हणाल्या.

अलका यांनी दिलेली ही माहिती वाचून सगळेच दु:खी झाले आहेत. चित्रपटसृष्टीतील इला अरुण, सोनू निगम आणि पूनम धिल्लन या कलाकारांनी अलका यांच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;