सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाआधी भावाची क्रिप्टिक पोस्ट, ‘समस्या आहे की…’

सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाआधी भावाची क्रिप्टिक पोस्ट, ‘समस्या आहे की…’

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध आहे, असं देखील सांगितलं जात आहे. शिवाय अभिनेत्रीचे माना पहलाज निहलानी यांनी देखील अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शत्रुघ्न सिन्हा लग्नात उपस्थित राहातील की नाही माहिती नाही. पण वडील मुलीवर किती दिवस नाराज राहू शकतील.’

दरम्यान अभिनेत्रीच्या भावाने देखील लग्नाला काही दिवस बाकी असताना सोशल मीडियावर एका क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. सोनाक्षी हिचा भाऊ लव याने त्याच्या बाकू ट्रिपचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडिया अकाउंट पाहता तो बहीण सोनाक्षीला फॉलो करतो असे वाटत नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Luv Sinha (@luvsinha)

पोस्टमध्ये अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘वेळेनुसार समस्या अशी आहे की आपल्याकडे वेळ देखील पर्याप्त नसते…’ याआधी देखील लव याने बहिणीच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘‘मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधी काहीही घेणं-देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला रंगणाऱ्या चर्चांपासून दूर राहायचं आहे… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. 19 जूनपासून दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर 23 जून रोजी लग्न आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे.

पण दोघांच्या लग्नाबद्दल कुटुंबियांमध्ये नाराजी आहे, असं देखील सांगण्यात येत आहे. ‘आताची मुलं आई-वडिलांना काहीही सांगत नाही. त्यांची परवानगी घेत नाहीत फक्त निर्णय घेतात. मला देखील प्रतिक्षा आहे, की सोनाक्षी मला लग्नाबद्दल कधी सांगेल.’  असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;