गाईची बळजबरीने गर्भधारणा करून..; स्वरा भास्करने शाकाहारींवर साधला निशाणा

गाईची बळजबरीने गर्भधारणा करून..; स्वरा भास्करने शाकाहारींवर साधला निशाणा

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकतीच तिने एका फूड ब्लॉगरला शाकाहारी असण्यावरून टीका केली आहे. नलिनी उनागर या फूड ब्लॉगरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शाकाहारी थाळीचा फोटो पोस्ट केला. शाकाहारी असल्याचा अभिमान आहे, असंही तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. त्यावर स्वराने दिलेल्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नलिनी यांनी बकरी ईदच्या दिवशी हा फोटो पोस्ट केला. त्यांच्या थाळीत भात, पनीर यांसारखे शाकाहारी पदार्थ पहायला मिळत आहेत. त्यावर त्यांनी लिहिलं, ‘मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे. माझी थाळी ही अश्रू, क्रूरता आणि अपराधीपणाच्या भावनेपासून मुक्त आहे.’

नलिनीच्या या पोस्टवर उत्तर देताना स्वराने म्हटलंय, ‘प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला शाकाहारी लोकांचा हा आत्मसंतुष्टपणा कधीच समजला नाही. तुमचा संपूर्ण आहार हा वासराला त्याच्या आईचं दूध नाकारण्यापासून बनला आहे. गायींना बळजबरीने गर्भधारणा करायला भाग पाडणं, त्यांना त्यांच्या बाळांपासून वेगळं करणं आणि त्यांचं दूध चोरणं यापासूनच तुमचा आहार बनलाय.’ या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘तुम्ही मुळासह भाज्या खाता? यामुळे संपूर्ण वनस्पती मारली जाते. कृपया नैतिकदृष्ट्या काय चुकीचं काय बरोबर हे दाखवण्याऐवजी तुम्ही आराम करा, कारण आज बकरीद आहे.’ स्वराच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलं, ‘तू हे सर्व यासाठी लिहितेय का, कारण तुला स्वत:ला दोषी असल्यासारखं वाटतंय, स्वरा बेगम?’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, ‘ती असा आवाज उठवतेय जणू ती वासरूवर प्रेम करू लागली असेल. अरे हा, तिला वासरू तर आवडत असेल, पण कबाबसाठी.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘वासराला आईच्या दुधापासून वेगळं करणं चुकीचंच आहे, पण जनावरांची हत्या करणं योग्य आहे का? ‘

स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी 2023 रोजी समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी निकाह केला होता. या दोघांनी धर्माची भिंत ओलांडून आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख दिली होती. आधी कोर्ट मॅरेज आणि त्यानंतर धूमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;