पत्नीने लफडय़ाचे मेसेज पाहून दिला घटस्फोट; नवऱ्याने अॅपलवर ठोकला 53 कोटांचा दावा

पत्नीने लफडय़ाचे मेसेज पाहून दिला घटस्फोट; नवऱ्याने अॅपलवर ठोकला 53 कोटांचा दावा

युकेमधील एका व्यावसायिकाने अॅपल कंपनीविरोधात दावा ठोकला आहे. या व्यावसायिकाने आपल्या आयफोनवरून सेक्स वर्करला मेसेज पाठवले होते आणि नंतर पर्मनंट डिलीट केले होते. मात्र तरीही ते मेसेज पत्नीला फॅमिली आयमॅक डिव्हाईसवर मिळाले. त्यामुळे संतापून पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. या सगळ्या प्रकाराला अॅपल कंपनी जबाबदार असल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे.

या व्यावसायिकाने आपले नाव उघड केलेले नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण कोणतेही मेसेज पर्मनंटली डिलीट करतो, तेव्हा ते आपल्या पह्नमधून पूर्णपणे डिलीट होतात, असाच आपला समज असतो. मात्र मेसेज डिलिट केले तरीही ते आयपह्न आयडीला लिंक असलेल्या सर्व डिव्हाईसवर राहतात, हे अॅपलने सांगितलेले नाही. अॅपलने डिलीट मेसेजसंदर्भातील धोरण स्पष्ट केलेले नाही.  सेक्स वर्करला पाठवलेले सगळे मेसेज व्यावसायिकाच्या पत्नीला  मिळाले आणि तिने कोर्टात घटस्पह्टासाठी धाव घेतली. घटस्पह्टाच्या  खटल्याचा खर्च आणि इतर नुकसानभरपाई असे मिळून पाच दशलक्ष पाऊंडची मागणी व्यावसायिकाने अॅपल कंपनीकडे केली आहे.

घटस्फोटासाठी अॅपल जबाबदार

पती-पत्नीच्या घटस्पह्टासाठी अॅपल जबाबदार आहे, असा दावा  या व्यक्तीने केला आहे.

ज्यांना फोन कसा वापरायचा माहिती नाही अशा पुरुषांकडून अॅपल विरोधात सामुहिक खटला दाखल करण्याचा विचार या व्यक्तीने केला आहे.

जर पत्नीला अशा निर्दयपणे मेसेज सापडले नसते तर वेगळ्या मार्गाने, तर्कसंगत संवाद साधून हे लग्न वाचवता येऊ शकले असते

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;