मशीद बंदर येथील इमारतीला आग, लाकडी इमारतीचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

मशीद बंदर येथील इमारतीला आग, लाकडी इमारतीचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

मशीद बंदर येथील चकाला मार्गावरील चार मजली रहिवासी इमारतीला आज दुपारी आग लागली. इमारत लाकडी असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात धूर झाल्याने एकच घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.

मशीद बंदर येथील चकाला स्ट्रीट, झकेरिया रोडवर चार मजली इमारत आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका घराला दुपारी एकच्या सुमाराला आग लागली. इमारतीचे बांधकाम लाकडी असल्यामुळे ही आग बाजूच्या दोन घरांमध्येही पसरली आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. इमारतीमधील सर्व रहिवासी इमारती बाहेर पडले. मात्र, चौथ्या मजल्यावरच एक वृद्ध जोडपे अडकून पडले होते. प्रसंगावधान राखून तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी अडकून पडलेल्या वृद्ध जोडप्याला सुखरूप इमारतीबाहेर आणले. दरम्यान, आगीत इमारतीचा जिना जळून खाक झाला. त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी खालून आणि बाजूच्या दोन इमारतींमधून पाण्याचा मारा करून साडेतीन तासांनी आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, चौथ्या मजल्यावरील तीन घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;