17 हजार पदांसाठी 17 लाख उमेदवार, उद्यापासून पोलीस भरतीची मैदानी परीक्षा

17 हजार पदांसाठी 17 लाख उमेदवार, उद्यापासून पोलीस भरतीची मैदानी परीक्षा

राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून मुंबईसह राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली आहे. असे कृत्य करणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील पोलीस दलात रिक्त पदे आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत होता. त्यामुळे गृह विभागाने 17 हजार 471 पदे भरण्याचा निर्णय घेतला. 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी केली गेली. मुंबईसह राज्यात 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांची मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू होत आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱया ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिह्यात मैदानी आणि लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले. एक उमेदवार हा दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र तो दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा पुढे ठेवली जाईल. पावसाचा अंदाज पाहून मैदानी परीक्षेची माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल. मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी येणाऱया उमेदवारांची व्यवस्था वेल्फेअर हॉलमध्ये करण्यात येणार आहे. यापूर्वी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहायची व्यवस्था नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. पर जिह्यातून मुंबईत भरतीसाठी येणाऱया उमेदवारांना रात्र रस्त्यावर काढावी लागत होती. रस्त्यावर झोपताना डास चावणे, झोप पुरेशी होत नसल्याच्या तक्रारी उमेदवाराच्या होत्या. पण पावसात मैदानी परीक्षा असल्याने त्या उमेदवारांची योग्य व्यवस्था केल्याने त्याचा उमेदवारांना फायदा होणार आहे.

परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.गेल्या भरतीच्या वेळी जे गैरप्रकार झाले ते होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच गेल्या भरतीच्या वेळेस गैरप्रकार करणाऱया उमेदवारावर गुन्हे दाखल झाले होते. तसेच यंदा देखील गैरप्रकार करणाऱयावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;