12 आमदार नियुक्तीचा गुंता, हायकोर्टात आज सुनावणी

12 आमदार नियुक्तीचा गुंता, हायकोर्टात आज सुनावणी

विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीसंबंधी उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होत आहे. नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत मिंधे सरकारने खो घातल्याचा दावा शिवसेनेने जनहित याचिकेतून केला आहे. याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी मिंधे गटाच्या गोपीकिशन बजोरिया यांनी अर्ज केला आहे. या अर्जाची वैधता न्यायालय ठरवणार आहे.

शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी अॅड. सिद्धार्थ मेहता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मागील सुनावणी वेळी मिंधे गटाच्या बजोरिया यांना झापले होते. राजकीय लढाईसाठी कोर्टाचा वापर करू नका, अशी ताकीद दिली होती. त्याच वेळी मूळ याचिकाकर्ते मोदी यांना बजोरिया यांच्या अर्जावर उत्तर सादर करण्यास मुभा दिली होती. मोदी यांच्या उत्तराची दखल घेऊन खंडपीठ बजोरिया यांच्या अर्जाची वैधता ठरवणार आहे. तसेच मूळ याचिकेवर युक्तिवाद सुरू होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;