रिल्स बनविणे जीवावर बेतले, सुलिभंजन पर्वतावरून कार दरीत कोसळुन तरुणी ठार

रिल्स बनविणे जीवावर बेतले,  सुलिभंजन पर्वतावरून कार दरीत कोसळुन तरुणी ठार

प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या सुलिभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रिल्स बनविताना कार दारीत कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. कार चालवत रील बनवत असताना दरीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. ही घटना सोमवारी (दि.17) दुपारी 2 च्या दरम्यान घडली.

सुलिभंजन पर्वतावर असलेल्या दत्तधाम मंदिर येथे श्वेता दीपक सुरवसे (23) रा.हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर व शिवराज संजय मुळे (25) रा. हनुमान नगर हे दोघे टोयाटो इटिऑस गाडीने सुलिभंजन येथील दत्त मंदिरात दर्शन व पर्यटनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या परिसरात काही छायाचित्रे घेतली. यानंतर श्वेताने गाडी चालवत रील बनवूया म्हणत गाडीमध्ये बसून ती रिव्हर्स घेत शिवराज मुळे यास मोबाईल मध्ये व्हिडीओ करण्यास सांगितले. तिला फारशी चांगली गाडी चालवता येत नसतानाही आग्रह करत तिने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. गाडीची स्टेरिंग इकडे फिरवल्यावर गाडी कुठे जाईल, असे विचारत ती चालवत होती. गाडीमागे घेत होती. शिवराज तिचा व्हिडीओ करत होता. गाडी दरीकडे जात असल्याचा अंदाज या दोघांनाही आला नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये गाडी दरीकडे जात असल्याचा अंदाज येताच शिवराज याने व्हिडीओ करत असताना हातातील मोबाईल फेकत कारकडे धाव घेतली. मात्र कार मोठ्या गतीने दरीमध्ये कोसळली. तीव्र उतार असलेल्या कपारीतून कार आदळत व वेगाने खाली जात असताना तिचे अनेक भाग तुटून पडत होते. 500 फूट खाली कोसळल्यानंतर अपघातग्रस्त कार एका जाळीमध्ये अडकली. मात्र तोपर्यंत गाडीच्या अक्षरशा ठिकर्‍या उडाल्या होत्या. यामध्ये श्वेता गंभीर जखमी झाली. अपघाताचा आवाज व आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी दरीमध्ये उतरून धाव घेत अपघातग्रस्त गाडीतून श्वेताला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रत्नपूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

रिल्स बनवत असताना खबरदारी न घेतल्याने तरुणीला आपले प्राण गमवावे लागले. सुलिभंजन परिसरात दरीकडील कठडे तुटल्याने हा भाग धोकादायक झाला आहे. या ठिकाणी कठाडे उभारून सुरक्षितता करणे गरजेचे झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;