राहुरी तालुक्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील सात्रळ – तांभेरे रस्त्यावर वारुळे वस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटनासोमवारी सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. मृत बिबट्याबाबत गणेश डुकरे, सुनिल कदम यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. म्हस्के यांनी वनविभागास माहिती दिली.अज्ञात वाहनाने रात्रीच्या वेळी बिबट्याला जोराची धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
म्हस्के यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर राहुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनपाल एल.पी.शेंडगे, यांनी राहुरी वनविभागाचे वनरक्षक शंकर खेमनर, वनकर्मचारी दिवे, झावरे,पठाण, वाहन चालक चारुदत्त गायकवाड घटनास्थळी दाखलहोत पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या रोपवाटिकेत पाठवण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List