अनिल कपूरची पोस्ट चर्चेत; तो फोटो शेअर करत म्हणाला, ही तर केवळ सुरुवात…

अनिल कपूरची पोस्ट चर्चेत; तो फोटो शेअर करत म्हणाला, ही तर केवळ सुरुवात…

अभिनेता अनिल कपूर हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनिल कपूरने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. एका खास फोटो पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे. अजून तर हा हात उचललाय कुठे? ही तर केवळ तयारी आहे…., असं म्हणत अनिल कपूरने ही पोस्ट शेअर केलीय. अनिल कपूरने सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ चित्रपटाची तयारी केली. या चित्रपटातील एक ॲक्शन-पॅक्ड झलक शेअर केली आहे. अनिल कपूर ‘सुभेदार’साठी सज्ज झालाय. सोशल मीडियावर या सिनेमातील BTS फोटो शेअर केलेत.

‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’ च्या यशात रमणारा अनिल कपूर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट कडे वळला असून ‘सुभेदार’ चित्रपटातील एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर करत त्याने या बद्दल ची माहिती दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुभेदार ची घोषणा करण्यात आली होती. अलीकडेच मेगास्टारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना तो ‘सुभेदार’ साठी कसा तयारी करत आहे हे सांगितले. फोटोसोबत अनिल कपूरने लिहिले, “अभी तो हाथ उठा ही कहां है, ये तो बस तय्यारी है #सुभेदार प्रेप सुरु होत आहे, असं म्हणाला.

‘सुभेदार’ या सिनेमाची ही फक्त एक झलक असून अनिल कपूर यांच्या पोस्ट वर चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. अनिल कपूर यांना चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल कपूर यात फुल-ऑन ॲक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचं कळतंय. अनिल कपूरने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लगेचच फायर आणि हार्ट इमोजीसह कॉमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ लवकरच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. अनिल कपूरच्या पोस्टने निःसंशयपणे या प्रकल्पाच्या आसपासची चर्चा वाढवली आहे. मेगास्टार सध्या बिग बॉस ओटीटी सीझन 3 चे होस्ट बनणार असून 21 जूनपासून हा नवीन प्रवास सुरू होणार आहे. याशिवाय, अभिनेता YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याची अफवा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;