बारा वर्षात निरंजन डावखरे यांनी पदवीधरांसाठी एकतरी ठोस कार्यक्रम राबवला का? रमेश कीर यांचा सवाल

बारा वर्षात निरंजन डावखरे यांनी पदवीधरांसाठी एकतरी ठोस कार्यक्रम राबवला का? रमेश कीर यांचा सवाल

कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे 12 वर्ष आमदार आहेत. त्यांनी या 12 वर्षात कोकणातील पदवीधरांसाठी एकतरी ठोस कार्यक्रम राबवला का? असा सवाल कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी केला आहे. ते म्हणाले की, मतदार संघातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचारादरम्यान मला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक 26 जूनला होत आहे. महाविकास आघाडीचे रमेश कीर निवडणूक रिंगणात आहेत. रमेश कीर यांनी रत्नागिरीतील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पदवीधरांसाठी काम करताना मला प्राधान्याने सुशिक्षित बेकारांना शासकीय नोकरभरतीमध्ये कसे स्थान मिळेल याकरीता प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर स्थानिक प्रकल्प आहेत त्यामध्ये स्थानिक पदवीधरांना नोकरी कशी मिळेल याकरीता मी प्रयत्नशील राहणार आहे. पर्यटनातून कोकणचा विकास होऊन त्यामधूनही पदवीधरांना रोजगार मिळावा याकरीता माझे प्रयत्न राहणार आहेत. जूनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरीता माझी आग्रही भूमिका आहे. उद्योगकेंद्रांनाही मी भेटी देऊन तेथील योजनांचा फायदा पदवीधरांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. कोकण बोर्डाला 13 वर्षे झाली. या 13 वर्षात सातत्याने दहावी-बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड अव्वल राहिले आहे. मात्र एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेत कोकणातील मुले मागे पडतात. ज्या संस्था यूपीएससी आणि एमपीएससीसाठी वर्ग चालवतात, त्यांच्यासाठी सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न आहे. राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमामुळे कोकणातील छोट्या शिक्षणसंस्था अडचणीत येणार आहेत. त्या शिक्षणसंस्थांना आधार देण्यासाठी काही उपक्रम राबवता येतील का याकरीता मी प्रयत्न करणार आहे, असे रमेश कीर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात मी प्रचार करत असून पदवीधर मतदारांकडून मला उत्स्फुर्त मिळत आहे. आमचे सहकारी पक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मला चांगले सहकार्य मिळत आहे,असेही कीर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;