आषाढी एकादशी सोहळा; शासकीय महापूजेसाठी मानाच्या 10 पालख्यांच्या प्रतिनिधीना निमंत्रण

आषाढी एकादशी सोहळा; शासकीय महापूजेसाठी मानाच्या 10 पालख्यांच्या प्रतिनिधीना निमंत्रण

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार 17 जुलै रोजी होणार आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. या महापूजेसाठी मानाच्या 10 पालखी प्रमुख प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दरम्यान, या शासकीय महापूजेवेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे व सल्लागार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतात.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मानाच्या पालखीच्या विश्वस्तांनी शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीकडून निमंत्रण मिळावे, अशी मागणी केली होती. त्यावर मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांची मागणी मान्य केली. तसेच या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक शासकीय महापूजेला आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मानाच्या पालखी प्रमुखांनी मंदिर समितीच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्याच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पालख्यांचा समावेश
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत सोपान देव महाराज, श्री संत मुक्ताई, श्री संत नामदेव महाराज, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर, श्री संत चांगावटेश्वर महाराज, श्री संत निळोबाराय महाराज या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;