राहुल गांधींचे ठरले…रायबरेलीचेच खासदार राहणार, वायनाडमधून प्रियांका गांधी रिंगणात उतरणार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागणार होता. दोन्ही मतदारसंघातील जनतेशी भावनीक नाळ जुळल्याने नेमका कोणता मतदारसंघ सोडावा, असा प्रश्न राहुल गांधीपुढे होता. तसेच ते काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू होती. आता राहुल गांधी यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार आहेत. ते रायबरेलीचे खासदार कायम राहणार असून वायनाड येथील जागा सोडणार आहेत. तसेच वायनाडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी रिंगणात उतरणार आहेत. लडकी हूँ, लढ सकती हूँ, असे म्हणत प्रियांका गांधी यांनीही वायनाड येथील पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. एकाच दिवशी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. राहुल गांधी रायबरेलीचे खासदार कायम राहणार असून प्रियांका गांधी प्रथमच निवडुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List