चुरमुरा येथे वीज पडून 21 बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या

चुरमुरा येथे वीज पडून 21 बकऱ्या मृत ,सुदैवाने मनुष्य हानी नाही 59 शेळ्या बचावल्या

>> प्रसाद नायगावकर

सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे अचानक आलेल्या वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह पावसात झाडावर वीज कोसळून झाडाखाली असलेल्या 17 बकऱ्या व 4 बोकड मृतपावले . ही घटना चुरमुरा शिवारात येथे दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही .

उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे आज दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहाच्या झाडाखाली गेल्या. नेमकी त्याच वेळी झाडावर वीज पडून 21 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या .चुरमुरा गावातील बंजारा तांडा येथील समाधान फुलसिंग राठोड हा बकरी चारक 80 बकऱ्या घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला होता. यामध्ये चुरमुरा येथील जवळपास 10 शेतकऱ्यांच्या बकऱ्या मृत झाल्या असून मोलमजुरी करून बकऱ्या घेऊन संगोपन करणाऱ्या पोटाची खळगी भरणाऱ्या या शेळी मालकांवर मोठे संकट ओढवले आहे. बकरी ईदच्या दिवशी आलेल्या संकटाने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजू सुरडकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . कुंभारे समवेत घटनास्थळाला भेट दिली व तात्काळ मृत झालेल्या सर्व बकरी व बोकडचे शवविच्छेदन करण्यात आले. या सर्व पशुधारकांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;