लाडक्या लेकीवर फार काळ नाराज..; सोनाक्षीच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीबाबत मामांचा खुलासा

लाडक्या लेकीवर फार काळ नाराज..; सोनाक्षीच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीबाबत मामांचा खुलासा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येत्या 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांची डिजिटल लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुंबईतच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं कळतंय. पूनम ढिल्लॉन आणि हनी सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनी लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. मात्र सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अद्याप त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे झहीरसोबत सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या आईवडिलांकडून नकार असल्याचं म्हटलं जात आहे. मुलीच्या लग्नाविषयी मला कोणतीच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली होती. आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या व्यक्तीने या सर्व घडामोडींवर मौन सोडलं आहे.

चित्रपट निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि सोनाक्षीच्या कुटुंबाचे निकटवर्तीय पहलाज निहलानी यांनी तिच्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे. येत्या 23 जून रोजी सोनाक्षीचं लग्न होणार असून ते त्याला लग्नाला उपस्थित राहणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सोनाक्षीसोबतच्या नाराजीमुळे शत्रुघ्न सिन्हा लग्नाला येणार नसल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

पहलाज निहलानी यांना सोनाक्षी तिचे मामा मानते. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना निहलानी म्हणाले की, “मामाच्या उपस्थितीशिवाय लग्न होऊ शकत नाही. शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या मुलीच्या लग्नाविषयी कल्पना नसल्याचं म्हणाले, कारण लोकसभा निवडणुकीच्या काळात ते तीन महिने बाहेरच होते. निवडणुकीच्या प्रचारात आणि इतर कामात ते प्रचंड व्यग्र होते. या कालावधीत सोनाक्षीची आई पूनम यांनी त्यांना लग्नाविषयीची माहिती वेळोवेळी दिली आहे. सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये कोणतीच नाराजी नाही. तिचे वडील आणि सर्व कुटुंबीय या लग्नाला उपस्थित राहतील.”

सोनाक्षीच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा हे नाराज होते अशी कबुली पहलाज निहलानी यांनी या मुलाखतीत दिली. मात्र ते आपली लाडकी मुलगी सोनाक्षीवर फार काळ नाराज असू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. आपल्या मुलीने तिच्या पसंतीने लग्न करण्यावरून वडील कशाला नाराज असतील, असा सवालही त्यांनी केला. “शत्रुघ्नजी यांनी स्वत: चाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं होतं. मग आता ते मुलीवर का नाराज होतील”, असं निहलानी यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;