नागपुरात भरधाव कारने 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

नागपुरात भरधाव कारने 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

पुण्यातील पोर्श कार अपघातनंतर अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या दुर्दैवी घटनांचे सत्र सुरुच आहे. नागपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका लहान मुलाचाही  समावेश आहे. दरम्यान या अपघातातील कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्यामुळे त्याने फुटपाथ झोपलेवरल्या बंजारा परिवारातील 9 लोकांना चिरडले. जखमींमध्ये चार महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. यामधील दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये 5 जण होते. हे पाचही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;