‘तारक मेहता..’च्या चंपकलाल यांना खऱ्या आयुष्यात ‘ही’ अत्यंत वाईट सवय
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका असून गेल्या 15 वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. टीआरपीच्या बाबतीत ही मालिका वर-खाली होत असली तरी अजूनही त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चंपकलाल गडा.
मालिकेत जेठालालचे वडील चंपकलाल गडा यांची भूमिका अभिनेता अमित भट्ट साकारतात. या मालिकेत चंपकलाल सर्वांना नेहमी चांगल्या गोष्टींची शिकवण देताना दिसतात. मुलगा जेठालालची ते नेहमीच कानउघडणी करताना दिसतात. मात्र खऱ्या आयुष्यात ते चेन स्मोकर असल्याचं कळतंय.
50 वर्षीय अमित भट्ट यांना 'तारक मेहता..' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी दिलीप जोशी यांच्यासोबत 'एफआयआर'सारख्या लोकप्रिय मालिकेतही काम केलंय. डीएनएच्या वृत्तानुसार, अमित भट्ट यांना एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये मानधन मिळतं.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित भट्ट हे सुरुवातीच्या काळात खूप बिडी प्यायचे. ते चेन स्मोकर होते असं समजतंय. दिलीप जोशी यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री असून दोघं अनेकदा सेटवर मजामस्ती करताना दिसायचे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List