बिग बींनी दाखवली घरातील मंदिराची झलक; शिवलिंगावर जलाभिषेक करत देवासमोर झाले नतमस्तक
बॉलिवूड महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. बिग बींनी आजवर अनेकदा फोटोंच्या माध्यमातून त्यांच्या 'जलसा' या घरातील भव्य मंदिराची झलक दाखवली आहे.
रविवारी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा जलसाच्या बागेत असलेल्या मंदिराची झलक नेटकऱ्यांना दाखवली. बिग बींनी रविवारी संध्याकाळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मुंबईतील 'जलसा' या बंगल्यातील बागेत बनवलेल्या मंदिराचे फोटो शेअर केले. या मंदिरात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्तींसह एक शिवलिंगसुद्धा पहायला मिळतंय.
बिग बींच्या बंगल्याच्या आत असलेल्या बागेत हे सुंदर संगमरवरचं मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगावर ते जलाभिषेक करताना दिसत आहेत. या मंदिराच्या आजूबाजूला छोटी-मोठी झाडं लावण्यात आली आहेत. आणखी एका फोटोमध्ये बिग बी देवासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List