दो आउटसाइडर्स ने इंडस्ट्री हिला दी…, शाहरुख – सुंशातचा ‘तो’ व्हिडीओ पाहाताच चाहत्यांच्या डोळ्यात आलं पाणी

दो आउटसाइडर्स ने इंडस्ट्री हिला दी…, शाहरुख – सुंशातचा ‘तो’ व्हिडीओ पाहाताच चाहत्यांच्या डोळ्यात आलं पाणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही अभिनेत्याचं निधन एक मोठं रहस्य आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य का संपवलं? या प्रश्नाचं उत्तर अद्याप चाहते आणि कुटुंबियांना मिळालं नाही. आज सुशांत जिवंत नसला तरी, अभिनेत्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. सध्या सुशांत याचा अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगयचं झालं तर, सुशांत आणि शाहरुख यांच्या कुटुंबातील कोणीच बॉलिवूडमधील नव्हतं. तरी देखील दोघांनी त्यांची ओळख निर्माण केली.

सध्या सोशल मीडियावर सुशांत आणि शाहरुख यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये सुशांत – शाहरुख भन्नाट डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघे किंग खानच्या ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमातील ‘रुक जा ए दिल दिवाने…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@srkking555)

 

Srkking 555 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील आनंद झाला. कारण दोघे देखील आउटसाइडर्स आहे. सांगायचं झालं तर, सुशांत याच्या निधनानंतर आउटसाइडर्स वाद टोकाला पोहोचला होता. शाहरुख – सुशांत यांचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘the outsiders of Bollywood’ असं लिहिण्यात आलं आहे.

नेटकरी देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडची सर्वात चार्मिंग जोडी…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सुशांत, शाहरुख खान याचा मोठा चाहता होता…’ सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज अनेकांच्या प्रेरणास्थानी अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील किंग खानचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अभिनेता आता ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये वांद्रे येथील राहात्या घरी गळफास घेत स्वतःलं संपवलं. सुशांत याला ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;