ब्रेकअपचं दुःख, आजी शर्मिला यांनी सांभाळलं; सारा म्हणाली, ‘काहीच चांगलं नव्हतं तेव्हा…’

ब्रेकअपचं दुःख, आजी शर्मिला यांनी सांभाळलं; सारा म्हणाली, ‘काहीच चांगलं नव्हतं तेव्हा…’

अभिनेत्री सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ सिनेमतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज सारा हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत सारा अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिच्या फक्त प्रोफेशनल आयुष्याची चर्चा नाहीतर, खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली. आता यशाच्या शिखरावर असलेल्या सााराच्या आयुष्यात अशी एक वेळ आली, तेव्हा अभिनेत्रीला आजी शर्मिला टागोर यांनी सांभाळलं.

ब्रेकअप, करिअर, ट्रोलर्सने साधलेला निशाणा यावर साराने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. सारा म्हणाली, ‘बडी अम्मा आमच्या सर्वांचा आवाज आहे. जेव्हा आयुष्यात गोष्टी कठीण वाटू लागतात तेव्हा आम्ही बडी अम्माची मदत घेतो. 2020 मध्ये माझ्या आयुष्यात देखील असंच काही झालं होतं. एक वेळ अशी होती, जेव्हा काहीच ठिक नव्हतं.’

‘माझे वडील तर माझ्यासाठी बंदूक घेऊन उभे होते. तेव्हाच माझी आजी, आई आणि भाऊ देखील माझ्यासाठी उभे होते. आजीने मला कायम परंपरा आणि संस्कृतीशी जोडून राहण्याची शिकवण दिली. ती चॅम्पियन आहे. आजी मला नेहमी चांगला सल्ला देते. सिनेमा, बॉयफ्रेंड, सोशल लाईफ… इत्यादी गोष्टींबद्दल आजी मला सांगत असते.’

‘आज जेव्हा मला ट्रोल केलं जातं तेव्हा माझ्याबद्दल बोलत आहेत… याचं समाधान मला असतं. एका अभिनेत्रीसाठी तिच्याबद्दल रंगत असलेल्या चर्चा फार महत्त्वाच्या असतात.’ असं देखील सारा म्हणाली. सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

सारा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘मेट्रो इन दिनो’ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री नुकताच ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. दोन्ही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते.

सारा हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते कायम असतात. सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, स्वभावामुळे देखील चर्चेत असते. सारा हिला अनेकदा चाहत्यांसोबत गप्पा मारताना स्पॉट करण्यात आलं आहे. अभिनेत्री कधीच चाहत्यांना निराश करत नाही. सोशल मीडियावर साराने चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर सारा देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम  स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;