…तर रोहित-विराटचे अपयश विसरले जाईल, संजय मांजरेकरांना विश्वास

…तर रोहित-विराटचे अपयश विसरले जाईल, संजय मांजरेकरांना विश्वास

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बॅट उपांत्य सामना किंवा अंतिम सामन्यात तळपते तर त्यांचे साखळीतील अपयश विसरले जाईल, असा विश्वास माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केला.

कोहली गेल्या तिन्ही सामन्यांत दोन अंकी धावसंख्याही गाठू शकला नाही तर रोहित आयर्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला असला तरी पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध तो अपयशी ठरला होता. मांजरेकर पुढे म्हणाले, जर तुम्ही रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंची निवड त्यांच्या अनुभवाच्या जोरावर केली आहे. आपल्या अनुभवी खेळाडूंना तुम्ही वर्ल्ड कपला घेऊन गेलात, जेणेकरून ते संघाला गरज असेल तेव्हा दमदार खेळ करतील. ते आता फॉर्मात नसले तरी मला त्यांची चिंता नाही. जर ते उपांत्य किंवा अंतिम सामन्यात जोरदार खेळ करून संघाला विजेता बनवण्यात यशस्वी ठरतात तर त्यांच्या अपयशाची कुणी चर्चाही करणार नाही. आपल्या दिग्गज खेळाडूंकडून सर्वांना याच कामगिरीची अपेक्षा असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;