आषाढी एकादशीला धनगर समाज आंदोलन करणार; पंढरपूर येथे धनगर समाजाची उद्रेक बैठक

आषाढी एकादशीला धनगर समाज आंदोलन करणार; पंढरपूर येथे धनगर समाजाची उद्रेक बैठक

धनगर समाज आषाढी एकादशीला आंदोलन करणार आहे. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत पंढरपूर येथे धनगर समाजाची उद्रेक बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील व सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे, एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पंढरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भावनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा, अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी, अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणार्‍या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा, या मागण्यांचा त्वरीत विचार व्हावा अन्यथा आषाढी एकादशीला आंदोलन करु, असा इशारा धनगर समजाकाडून देण्यात आला आहे. तर या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर येथे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या आहेत.धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला.

या बैठकीचे नेतृत्व सकल धनगर समाजाच्यावतीने करण्यात आले. यावेळी माऊली हळणवर, अमोल बापू कारंडे, सुभाष मस्के, आदित्य फत्तेपूरकर, सोमनाथ ढोणे, संतोष बंडगर, प्रशांत घोडके, मक्कन्ना बाराचारी, महेश खसगे, आप्पा पुजारी, बंडू पुजारी, प्रवीण सलगर, महेश गुंडे, दादा खटके, दादा कोळेकर, संजय माने, अमोघ सिद्ध पाटील, संजय लवटे, बाजीराव खडके, विजय चोरमले, सिताराम मेटकरी, सूर्यकांत येजगर, ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

… तर विधानसभेला परिणाम भोगा
गेल्या लोकसभेला धनगर समाजाने आपली ताकद महायुती सरकारला दाखवून दिलेली आहे. धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही केला तर येणार्‍या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;