पलायन केलेल्या अल्पवयीन नववधूला शोधण्यात पोलिसांना यश; प्रियकराची पोलीस कोठडीत रवानगी

पलायन केलेल्या अल्पवयीन नववधूला शोधण्यात पोलिसांना यश; प्रियकराची पोलीस कोठडीत रवानगी

जालन्यामध्ये अल्पवयीन नववधू तिच्या प्रियकरासोबतपळून गेली होती. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेतला असून तिच्या प्रियकराला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराने त्याच्या 16 वर्षांच्या मुलीला शिक्षणासाठी जालना तालुक्यातील धारकल्याण येथे बहिणीकडे पाठवले होते. त्यादरम्यान त्या मुलीचे महेश घोडके (20, रा. धारकल्याण) सोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या वडिलांनी अंबड तालुक्यातील आपल्या मूळगावी 31 मे 2024 रोजी नात्यातीलच एका मुलासोबत तिचे लग्न उरकले होते.

लग्नाच्या तिसर्‍या दिवशी मुलगी माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर त्या नववधू आणि तिचा पूर्वीचा प्रियकर महेश घोडके यांचा संपर्क झाला आणि त्यांनी 12 जून रोजी पळून जाण्याचा प्लॅन आखला. 12 जूनला दुपारी 4 वाजता वडिलांना मोबाईलवर मी ब्लॉऊज आणण्यासाठी जात असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली होती. आई-वडील आणि नातेवाईकांनी मुलीचा खूप शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यांनतर दोन दिवसांनी 14 जून रोजी वडिलांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी मुलीच्या प्रियकरासह त्याच्या काही मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस आणि पिंक मोबाईल पथक यांनी संयुक्तिकरित्या केला. पोलिसांनी तपासादरम्यान मुलीच्या प्रियकराच्या मित्राची चौकशी केली असता 12 जून रोजी प्रियकर महेश घोडके हा मुलीला मोतीबाग येथून मोटारसायकलवरून घेऊन परभणीला गेल्याची माहिती मिळाली. परभणी येथून रेल्वेने हैद्राबाद येथे गेल्याचे समजले. महेश घोडके आणि त्या मुलीने हैद्राबादमध्ये एका ठिकाणी भाड्याने खोली घेऊन तिथेच संसार थाटण्याचा विचार केला होता. मात्र, अल्पवयीन मुलीने परत जालन्याला जाण्याचा तगादा लावल्याने ते दोघे रेल्वेने छत्रपती संभाजीनगर येथे आले होते.

पोलीस आणि नातेवाईकांनी या दोघांची समजूत काढून त्यांना जालन्यात आणले. हैद्राबाद येथे भाड्याच्या खोलीत महेश घोडके याने बलात्कार केल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. त्यावरून गुन्ह्यामध्ये बलात्काराचे कलम वाढविण्यात आले आहे. अटकेत असलेल्या प्रियकर महेश घोडके यास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;