अवनीत कौर अडकणार विवाहबंधनात, कोण आहे नवरा मुलगा? म्हणाली, ‘आई – वडिलांच्या परवानगीनंतर’

अवनीत कौर अडकणार विवाहबंधनात, कोण आहे नवरा मुलगा? म्हणाली, ‘आई – वडिलांच्या परवानगीनंतर’

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) फक्त अभिनेत्री नाही तर, सोशल मीडिया स्टार देखील आहे. अवनीत तिच्या फॅशन सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड अदा आणि अन्य कोणत्या कारणामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अवनीत लग्नाबद्दल म्हणाली, ‘कायम मला लग्नाबद्दल विचारलं जातं. मला नाही माहिती चाहते माझ्या लग्नाबद्दल का चिंतेत आहेत? मी तुम्हाला सांगते माझ्या लग्नाला फार वेळ आहे. त्यामुळे शांत राहा आणि प्रतीक्षा करा…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला लव्ह मॅरिजवर विश्वास आहे. पण लव्ह मॅरिजसाठी आई – वडिलांकडून आशीर्वाद मिळाले तर, अरेंज आणि लव्ह दोन्ही मॅरिज करेल… मला असंच लग्न करायचं आहे आणि नाही झालं तर, एका कोपऱ्यात बसून मी एकटी रडेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

 

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अवनीत हिचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये अवनीत चाहत्यांना आंगठी दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसली. ज्यामुळे अवनीत हिने कोणालाही न सांगता साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला.

फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, ‘चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उशीर लागतो… या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा मी आता करू शकत नाही…’ असं लिहिलं होतं. त्यामुळे अवनीत हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

कोण आहे मुलगा?

अवनीत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव राघव शर्मा याच्यासोबत जोडलं जात आहे. दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत अशी देखील चर्चा आहे. अनेक ठिकाणी अवनीत – राघव यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील अवनीत कायम सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;