लोकांचं काय म्हणणंय याच्याशी मला..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी, प्राजक्ता माळीची खास पोस्ट

लोकांचं काय म्हणणंय याच्याशी मला..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी, प्राजक्ता माळीची खास पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी 14 जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी सोशल मीडियाद्वारे विविध कार्यकर्त्यांकडून, सर्वसामान्यांकडून आणि सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी राज ठाकरेंसाठी पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांनीसुद्धा सोशल मीडियावर राज ठाकरेंसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांच्यासाठी पोस्ट लिहिल्या आहेत. ‘तुम्हाला जाणलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे, अशा शब्दात तेजस्विनीने भावना व्यक्त केल्या आहेत. तर प्राजक्तानेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडित-

‘प्रिय राजसाहेब, हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका निस्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता. साहेब तुमच्या राजकारणाविषयी, तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही. किंबहुना ‘तुम्हाला जाणलेल्या’ कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन! हसत रहा साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini 🕊🧿 (@tejaswini_pandit)

प्राजक्ता माळी-

‘आदरणीय आपणांस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा, राज ठाकरेजी. जे करण्याची इच्छा आहे, ते काम हातात यावं. काम करताना आनंद मिळावा. त्यातून समाधान लाभावं, याच वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि ‘प्राजक्तराज परिवाराकडून’ शुभकामना. फोटोत दिसताय त्याप्रमाणे सदैव हसत रहा, प्रसन्न रहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा राज ठाकरेंना पाठिंबा असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी या कलाकारांकडून आवर्जून पोस्ट लिहिली जाते. या सेलिब्रिटींच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;