सिक्कीममधील भूस्खलनात 9 बळी
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाराशेहून अधिक पर्यटक सध्या सिक्किममध्ये अडकले आहेत. उत्तर सिक्कीममधील मंगन जिह्यात संततधार पाऊस पडत असून पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 15 विदेशी नागरिकांसह बाराशेहून अधिक पर्यटक अडकले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत रस्ते मार्ग, वीज, मोबाईल नेटवर्कचे मोठे नुकसान झाले आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मिंटोकगांग येथे अधिकाऱयांची एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली असून या बैठकीत पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List