पतीकडून फसवणूक झालेल्या दलजीतला करिश्माची साथ; म्हणाली ‘त्याने तिच्यासोबत..’

पतीकडून फसवणूक झालेल्या दलजीतला करिश्माची साथ; म्हणाली ‘त्याने तिच्यासोबत..’

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दुसऱ्या लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांतच ती पतीचं घर सोडून भारतात परतली. आपल्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल काही महिने मौन बाळगल्यानंतर तिने सोशल मीडियाद्वारे पती निखिल पटेलवर गंभीर आरोप केले. निखिलचे विवाहबाह्य संबंध असून त्याने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचं तिने म्हटलंय. तिच्या या आरोपांना फेटाळत निखिलने तिला थेट कायदेशीर नोटीस बजावली होती. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असून आता दलजीतची खास मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या बाजूने उभी राहिली आहे. आपल्या मैत्रिणीची फसवणूक केल्याचा आरोप करत करिश्माने निखिलवर संताप व्यक्त केला आहे.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दलजीतबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. दलजीतने तिच्या पतीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची ही पोस्ट आहे. त्यावर करिश्माने लिहिलं, ‘जे काही झालं ते व्हायला पाहिजे नव्हतं. माझी मैत्रीण दलजीतला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या व्यक्तीने तिच्यासोबत चुकीचं केलंय आणि मी शेवटपर्यंत तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहीन. सशक्त महिला सूड घेत नाहीत, त्या पुढे निघून जातात आणि कर्माला त्याचं काम करू देतात.’

करिश्माची पोस्ट-

दलजीत कौरने गेल्या वर्षी केन्यामधील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. निखिलचंही हे दुसरं लग्न असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीतसोबत झालेलं लग्न हे हिंदू विवाहपद्धतीनुसार असून कायदेशीररित्या त्याला मान्यता नसल्याचं निखिलने म्हटलंय. इतकंच नव्हे तर दलजीतला नोटीस पाठवत त्याने केन्याच्या घरातील तिला तिचं सर्व सामान घेऊन जाण्यास सांगितलं आहे. तिने ते सामान लवकरात लवकर नेलं नाही तर तो सर्व दान करेल, असंही त्यात म्हटलं होतं. त्यानंतर नुकतीच दलजीत केन्याला गेली.

दलजीतसोबतच्या लग्नाबद्दल निखिलने एका मुलाखतीत सांगितलं, “मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;