सोनाक्षी सिन्हासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर म्हणाला, ‘मला ती आवडते, पण…’

सोनाक्षी सिन्हासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर म्हणाला, ‘मला ती आवडते, पण…’

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे. झहीर – सोनाक्षी गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण झहीर याच्याआधी सोनाक्षी हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर होता. अर्जुन – सोनाक्षी यांनी ‘तेवर’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली.

सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अर्जुन – सोनाक्षी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता, पण दोघांनी कधीच यावर अधिकृत घोषणा केली नाही. पण दोघांचं नातं देखील फारर काही टिकलं नाही. सिनेमाची शुटिंग संपताच दोघांचे मार्ग वेगळे झाले. पण एका मुलाखतीत अर्जुन याने अभिनेत्री सोनाक्षी हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

मुलाखतीत अर्जुन कपूर याला सोनाक्षी हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेता म्हणाला, ‘काही नाती फार काळ टिकत नाहीत. काही नाती फक्त सिनेमांपर्यंत असतात. त्यानंतर लोकांचे मार्ग वेगळे होतात. मला सोनाक्षी आवडते. पण अनेकदा असं भासवण्यात येतं की, आमच्यामध्ये वाद आहेत. असं काहीही नाही. आम्ही एकमेकांना भेटतो. आमच्या दोघांवर देखील नातं टिकवण्यासाठी कोणता दबाव नाही…’

सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, दोघांचे विचार वेगळे असल्यामुळे अर्जुन – सोनाक्षी यांचे मार्ग वेगळे झाले. सोनाक्षी प्रचंड इमोशनल मुलगी आहे. ती स्वतःच्या भावना लपवू शकत नाही. तर अर्जुन जास्त इमोशनल नाही. सोनाक्षीला सतत अर्जुन याच्यासोबत राहायचं होतं. पण अर्जुन याला सतत एकत्र राहायला आवडतं नव्हत.. सतत फोन करणं… हे देखील नातं तुटण्याचं कारण असल्याचं सांगितलं जात होतं. पण अर्जुन – सोनाक्षी यांनी कधीच नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही.

अर्जुन याच्यासोबत ब्रेकअपनंतर सोनाक्षी हिच्या आयुष्यात अभिनेता झरीन इक्बाल याची एन्ट्री झाली. आता अभिनेत्री झहीर याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मुंबईत दोघांच्या लग्नाची पार्टी होणार आहे.

अर्जुन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता, अभिनेत्री मलायका अरोरा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण आता त्यांचे मार्ग वेगळे झाल्याची देखील चर्चा रंगली आहे. पण यावर अर्जुन – मलायका यांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;