T20 WC 2024 : ऑस्ट्रेलियाच्या विजयानं इंग्लंडसाठी ‘सुपर-8’चं दार उघडलं, स्कॉटलंडचं स्वप्न भंगलं
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवला आणि इंग्लंडच्या संघाच्या जिवात जीव आला. स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडला टी20 वर्ल्डकपच्या ‘सुपर-8’ फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ‘ग्रुप-बी’ मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने ‘सुपर-8’चे तिकीट मिळवले आहे.
स्कॉटलंडने विजयासाठी दिलेलेय 181 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 186 धावा करत पूर्ण केले. टीम डेव्हिडने षटकार खेचत ऑस्ट्रेलिया विजयावर आणि इंग्लंडच्या ‘सुपर-8’मधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. ट्रॅव्हिस हेड याने 49 चेंडूत 68 आणि मार्कस स्टॉयनिसने 29 चेंडूत 59 धावांती आतषी खेळी करत संघाला विजयाचे दार उघडून दिले.
Australia finish Group B unbeaten and knock Scotland out of the #T20WorldCup after a tense clash in St Lucia
#AUSvSCO: https://t.co/p84gm73bKM pic.twitter.com/nLw4P5buHA
— ICC (@ICC) June 16, 2024
तत्पूर्वी करो या मरो लढतील स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. स्कॉटलंडने निर्धारित षटकांमध्ये 5 बाद 180 धावा उभारल्या. ब्रँडन मॅकमुलन याने 34 चेंडूत 6 धावा केल्या. यात त्याच्या 2 चौकारांचाआणि 6 षटकारांचा समावेश आहे. त्याला बेरिंग्टन याने 42 आणि मुन्से याने 35 धावा काढत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर एश्टन एगर, नाथन एलिस आणि एडम झंपा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
सुपर-8 चे संघ
दरम्यान, ‘ग्रुप -ए’मधून हिंदुस्थान आणि अमेरिका, ‘ग्रुप-बी’मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, ‘ग्रुप-सी’मधून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, ‘ग्रुप-डी’मधून अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ ‘सुपर-8’ साठी पात्र ठरले. तर यंदाच्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड यासारख्या दिग्गज संघांना साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List