Nagar News : राहुरी तालुक्यात घडली धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीचे सिनेस्टाईल अपहरण

Nagar News : राहुरी तालुक्यात घडली धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीचे सिनेस्टाईल अपहरण

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्याप्रमाणत वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी श्रीरामपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना घडली होती. त्यानंतर देवळाली प्रवरा येथे अल्पवयीन विद्यार्थीनीच्या आत्महत्येची घटना घडली. या घटना ताज्या असतानाच आता राहुरी कॉलेजमधील एका अल्पवयीन मुलीचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सदर घटना 12 जून 2024 रोजी राहुरी तालुक्यात असणाऱ्या कोल्हार खुर्द येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय पीडित मुलगी आईसोबत गवत आणण्यासाठी गेली होती. दरम्यान पीडित मुलगी एकटी पुढे निघून गेली आणि तिची आई, बहिण आणि भाऊ गवत घेऊन पाठिमागून येत होते. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्ती टाटा मॅझीक गाडीमध्ये बसवल आणि तिचे अपहरण करत तिला पळवून नेले. पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत प्रविण भोसले रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करत आहेत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;