दहशतवादी हल्ल्यातून बचावलेला अभिनेता म्हणतो, ‘धक्क्यातून सावरलो, पण ते सगळं पाहिलं आणि…’

दहशतवादी हल्ल्यातून  बचावलेला अभिनेता म्हणतो, ‘धक्क्यातून सावरलो, पण ते सगळं पाहिलं आणि…’

जम्मूमध्ये शिवखोरी येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर रविवारी म्हणजे 9 जून रोजी भीषण हल्ला झाला. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये झालेला हल्ला प्रचंड भयानक होता. यात 10 निष्पाप यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून, 33 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता पंकित ठक्कर जम्मू- काश्मीरमधील रियासी याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याची माहिती देखील समोर येत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेता पंकित ठक्कर कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराकडे चालत जाणार होता. पण त्याआधीच जवळपासच्या जंगलात दबा धरुन बसलेले दहशतवादी अचानक समोर आले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केल्याची माहिती अभिनेत्याला मिळाली. त्यामुळे पंकित याला यात्रा पूर्ण करता आली नाही.

अभिनेता म्हणाला, ‘झालेल्या हल्ला प्रचंड भयानक होता. त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्यासाठी मला इतक्या दिवसांचा कालावधी लागला. मी लोकांना गर्दीत, मोठ्या दुःखात पाहिलं आहे. तेव्हाचं चित्र फार भयानक होतं. मला पाहून दुःख देखील झाली आणि माझा संताप देखील अनावर झाला. गेल्या काही दिवसांपासून जम्मू – काश्मीरमध्ये परिस्थिती गंभीर आहे.’

‘सतत सुरु असलेले दहशतवादी हल्ले… हल्ल्यात निष्पाप लोकांनी त्यांचे प्राण गमावणं. प्रदेशात वाढलेल्या तणाव… या गोष्टी प्रचंड निराशाजनक आहेत. हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून मन दुःखी होतं. अशा हिंसक घटनांमुळे लोकांचे प्राण जात आहेत..’

‘जम्मू-काश्मीर एक सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. पण अशा घटनांमुळे शहराचं सौंदर्य कमी होत आहे. सतत होणाऱ्या अशा भ्याड आणि वाईट हल्ल्यांविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे… अशी आवण रियासी याठिकाणी झालेला हल्ला करून देत आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याने सांगितलेल्या अनुभवाची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अभिनेत्याने झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासनाला सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं आहे. हल्ल्यानंतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध आणि संताप व्यक्त केला. कपिल शर्मा, हिना खान, रुपाली गांगुली आणि अली गोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

अभिनेता पंकित ठक्कर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘बरसाते’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आला. अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पंकित सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;