गुजरातमध्ये मुस्लिम महिलेला फ्लॅट देण्यास विरोध
‘सबका साथ आणि सबका विकास’ अशी घोषणा देणाऱया भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. परंतु वडोदरामधील एका मुस्लिम महिलेला मुख्यमंत्री निवास योजने अंतर्गत एक फ्लॅट मिळाला. परंतु या महिलेला हा फ्लॅट देण्यात येऊ नये, अशी मागणी येथील बहुसंख्य हिंदू लोकांनी केली आहे. वडोदरामधील मोटनाथ रेसिडेंसीमध्ये एकूण 462 फ्लॅट्स आहेत. यातील 461 घरे ही हिंदूची आहेत तर केवळ एक घर हे मुस्लिम महिलेचे आहे. हिंदू समाजातील 33 लोकांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांना निवेदन दिले असून मुस्लिम महिलेच्या घराचे वाटप अवैध ठरवण्याची मागणी केली आहे. विरोधाचा सामना करत असलेल्या 44 वर्षीय मुस्लिम महिलेला तिच्या मुलासह येथे शिफ्ट व्हायचे आहे. घरवाटपाच्या वेळी म्हणजेच 2020 पासूनच विरोध सुरू झाला होता. येथील लोकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला (सीएमओ) पत्र लिहून माझ्या घराचे वाटप रद्द करण्याची मागणी केली होती, असे मुस्लिम महिलेने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List