आयटी क्षेत्रात मंदीचे सावट; ऑफर मिळूनही 10 हजार फ्रेशर्सना नोकरी मिळेना

आयटी क्षेत्रात मंदीचे सावट; ऑफर मिळूनही 10 हजार फ्रेशर्सना नोकरी मिळेना

आयटी क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार निर्माण होतात. असं असलं तरी या क्षेत्रातही आता मंदीचे सावट असल्याचे दिसून येतंय. कारण आयटी क्षेत्रातील फ्रेशर्सना नोकरीची ऑफर मिळूनही प्रत्यक्षात नोकरी काही मिळताना दिसत नाहीय. मागील दोन वर्षांत देशातील किमान 10 हजार फ्रेशर्सना नोकरीची ऑफर देण्यात आली. मात्र आयटी कंपन्यांनी अद्याप त्यांना नोकरीत रुजू केलेले नाही. आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.  आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीतसिंग सलुजा यांनी सांगितले की, फ्रेशर्स उमेदवारांना टीसीएस, इन्पहसिस, विप्रो, झेन्सर आणि एलटी आयमाईंटड्री या कंपन्यांमध्ये ऑफर देण्यात आली होती. कॅम्पस प्लेसमेंट आणि अन्य पद्धतीने ऑफर मिळाली. मात्र अद्याप त्यांना कंपन्यांनी जॉईन करून घेतलेले नाही. या फ्रेशर्सनी कामगार संघटनेशी संपर्क साधला आहे. त्यांच्या तक्रारींमध्ये मोठय़ा आयटी कंपन्यांचीही नावे आहेत.  उत्तर अमेरिका व युरोपमधील व्यावसायिक अनिश्चिततेमुळे नवीन लोकांना रुजू होण्यास विलंब लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;