मुहूर्त ठरला! म्हाडाच्या 173 दुकानांचा 27 जूनला ई-लिलाव

मुहूर्त ठरला! म्हाडाच्या 173 दुकानांचा 27 जूनला ई-लिलाव

आचारसंहितेमुळे रखडलेल्या म्हाडाच्या दुकानांच्या विक्रीसाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांच्या विक्रीसाठी पात्र अर्जदारांसाठी 27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. तर ई-लिलावाचा निकाल 28 जूनला सकाळी 11 वाजता https://mhada.gov.in तसेच  www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाहीर होईल.

म्हाडातर्फे विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या 173 दुकानांच्या विक्रीसाठी 27 फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अर्जदारांना 6 जूनपर्यंत मुदत होती, मात्र लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता ई-लिलावाची तारीख आणि वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे. दुकानांसाठी आतापर्यंत जवळपास सहाशे जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;