विद्यार्थी-पालकांची लगबग… आज शाळेचा पहिला दिवस; गणवेश मिळणार नाहीत, पाठय़पुस्तकांची भेट

विद्यार्थी-पालकांची लगबग… आज शाळेचा पहिला दिवस; गणवेश मिळणार नाहीत, पाठय़पुस्तकांची भेट

राज्यातील शाळा उद्या 15 जूनपासून होत आहे. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

पेंद्र सरकारचा स्टार्स उपक्रम आणि समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये हा शैक्षणिक पाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाणार आहे. रांगोळीच्या पायघडय़ा घालून विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. शैक्षणिक साहित्य, पाठय़पुस्तके, खाऊ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षण विभागातील स्थानिक अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत.

शिक्षण मंत्री, अधिकारी जर्मनीच्या दौऱ्यावर

राज्यातील शाळांची सुरुवात ही 15 जून रोजी होणार असताना शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, समग्र शिक्षा अभियानचे प्रमुख प्रदीपकुमार डांगे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह अनेक अधिकारी जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसातील शाळा प्रवेश उत्सव आणि इतर कार्यक्रम हे शिक्षण मंत्र्यांच्या गैरहजेरीत होणार आहे.

पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशाविना

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय प्रक्रिया आणि ऐन वेळी मोफत गणेवशातील बदल करण्यात आल्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील लाखो विद्यार्थी नवीन गणवेशाविनाच शाळेत जाणार आहेत. या वेळी गणवेश पुरविण्यासाठीच्या धोरणातच मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आला आहे. यात शालेय गणवेश हे स्काऊट आणि गाईडच्या गणवेशाप्रमाणे निश्चित करण्यात आले असून त्यासाठी एक गणवेश हे शाळा व्यवस्थापन समित्या आणि दुसरा राज्यातील महिला बचत गटांच्या मार्फत तयार करून दिला जाणार आहे. मात्र यात शाळा व्यवस्थापन समित्यांचा काही जिह्यांमध्ये अपवाद वगळता राज्यातील बहुसंख्य शाळांमध्ये हा नवीन गणवेश तयार होऊ शकला नाही.

शालेय शिक्षण विभागाची सारवासारव

राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेची अंमलबजावणी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. त्यानुसार महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले अशी सारवासारव शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

मुंबई परिसरात पहिली ते आठवीच्या 60 लाख पाठय़पुस्तकांचे वाटप

मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालया अंतर्गत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुमारे 10 हजार शाळांत 59 लाख 90 हजार 126 पाठय़पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. मुंबईत 23 लाख 87 हजार 75 पुस्तके, रायगडमध्ये 7 लाख 28 हजार, ठाणे 6 लाख 20 हजार 658, पालघर 10 लाख 56 हजार, उल्हासनगर 1 लाख 5 हजार, भिवंडी 2 लाख 34 हजार, कल्याण-डोंबिवली 2 लाख 55 हजार, नवी मुंबई  2 लाख 48 हजार, मीरा-भाईंदर 53 हजार पुस्तके पुरवली आहेत. एकूण या पालिका क्षेत्रात असलेल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 59 लाख 90 हजार 361 पाठय़पुस्तके पुरवली आहेत. 100 टक्के पाठय़पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;